टाईम प्लीज
* टाईम प्लीज * सायंकाळी घरासमोरील गार्डन मध्ये थोडा वेळ जाऊन बसणं ही माझ्या आवडत्या गोष्टींपैकी एक. निसर्ग हा खरंच एक मोठा ऊर्जास्रोत आहे , निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवला की हीच ऊर्जा मनाच्या , शरीराच्या पोकळीत जाऊन चैतन्य निर्माण करते असा आभास होतो. गार्डन मध्ये याच ऊर्जेने खेळणारी मुले बघून आपल्या लहानपणीच्या खेळाची उजळणी करणे म्हणजे सुखद अनुभव. त्यादिवशी पण मुलांचा खेळ असाच रंगात आला होता. तितक्यात सोनम च्या आईने तिला जोरात हाक मारली सोनम ssss ! सोनमची जायची अजिबात ईच्छा नव्हती पण आई रागवेल म्हणून गेली बिचारी , जातांना जोरात ओरडून गेली ' टाईम प्लीज sssss '! मला गंमत वाटली ....दोन शब्दांची जादू बघा , गडीही टिकवून ठेवते आणि खेळही अबाधित राहतो. सोनमचे ते दोन शब्द अजूनही कानात घुमत होते ' टाईम प्लीज.... टाईम प्लीज.... '! असे वाटले आयुष्यरूपी खेळातही आपण अशी time please घेतली तर ? मी तर म्हणेन घ्यायलाच हवी. आजच्या Globalization च्या युगात आर्थिक , सामाजिक , मानसिक पातळीवरचे खेळ सारखे खेळावे लागतात. खेळाचे नियमही कसे सारखे बदलणारे. स्थिरता अशी कोठे...